जळगाव जिल्हामुक्ताईनगर

सुकळी येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीस स्थगिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । सुकळी (ता.मुक्ताईनगर) येथील प्रभाग क्र.२ मधील ओबीसीच्या एका रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीस ५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.मात्र,निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वे ओबीसी प्रवर्गातील जागांसाठी घेतली जाणारी निडणुक स्थगित निर्णयामुळे उमेदवारांचा हिरामोड झाला असून,उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.तर १३ गावातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

तालुक्यातील १३ गावातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका आहेत.महालखेडा येथील प्रभाग क्र.१ मधुन अनुजमाती महिला,वढोदा येथील प्रभाग क्र.४ मधील सर्वसाधारण,चिंचखेडा बु.येथील प्रभाग क्र.१ व २ मधील अनुजमाती महिला, दुई येथील प्रभाग क्र.१ मधील सर्वसाधारण महिला व थेरोळा येथील प्रभाग क्र. १ मधील अनुजमाती अशा रिक्त जागांसाठी निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे.

महालखेडा व हलखेडा येथील प्रत्येकी एक जागा बिनविरोध

महालखेडा येथील प्रभाग क्र.१ मधील अनुजमाती या रिक्त जागेसाठी दाखल झालेल्या दोन अर्जापैकी छानणीअंती एक अर्ज बाद झाल्यामुळे येथील एक जागा बिनविरोध आहे. तसेच हलखेडा येथील प्रभाग क्र.३ मधील अनुजमाती महिला या रिक्त जागेसाठी केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे हि जागाही बिनविरोध निघणार आहे.

मात्र काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही.हलखेडा येथील प्रभाग क्र.३ अनुजमाती महिला,चिंचखेडा खु.येथील प्रभाग क्र.३ अनुजमाती महिला,पिंप्रीनांदु येथील प्रभाग क्र.३ साठी अनुजमाती, रुईखेडा येथील प्रभाग क्र.२ साठी अनुजमाती महिला,राजुरा प्रभाग क्र.१ अनुजमाती महिला व वायला येथील प्रभाग क्र.१ मधील अनुजमाती महिलांच्या दोन रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेच नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button