15 हजारांची लाच भोवली ! जळगावातील प्रदूषण महामंडळाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सप्टेंबर 24, 2025 10:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातून लाचखोरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. जळगावातील प्रदूषण महामंडळाच्या क्षेत्र अधिकार्‍याला 15 हजारांची लाच मागून ती खाजगी पंटराद्वारे फोन पे अ‍ॅपवरून स्वीकारताना जळगाव एसीबीने अटक केली आहे. राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (42, नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव असून या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तर खाजगी पंटर मनोज बापू गाजरे हा कारवाईची कुणकुण लागताच पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

lach jpg webp

रावेरातील एका हॉस्पीटलमध्ये तक्रारदार मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. हॉस्पीटल मालकाने 16 मार्च रोजी हॉस्पीटल बायोवेस्ट संदर्भात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव यांच्याकडे अर्ज केला होता. अर्जात राजेंद्र सूर्यवंशी यांनी त्रृटी काढल्यानंतर नाशिक प्रदूषण मंडळ कार्यालयात अर्ज करण्यात आला व 28 ऑगस्ट 2025 रोजी प्रमाणपत्र मिळवण्यात आले

मात्र जळगाव कार्यालयात केलेला अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार 11 सप्टेंबर रोजी गेल्यानंतर सूर्यवंशी 15 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी 23 सप्टेंबर रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवार, 24 रोजी खाजगी पंटर मनोज बापू गाजरे याने फोन पे द्वारे लाच स्वीकारली मात्र आरोपी पसार झाला तर सूर्यवंशी यास अटक करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now