जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२३ । आज पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवस आधीच जळगावात दाखल होताच जळगावात घुसलं अशा दोन शब्दांची प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांना डिवचलं. त्यानंतर दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी सुरु आहेत. त्यातच आता गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील
संजय राऊत याची आम्हाला काय भीती असा एकेरी उल्लेख करत दम असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा खासदार होऊन दाखवावा, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे.
ना.पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेमध्ये हे जे नतद्रष्ट लोक आहेत की ज्यांनी शिवसेनेची वाट लावली. त्यांना आमचा विरोध आहे व हा विरोध कायम राहील, असे उत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर दिले आहे. खासदार संजय राऊत यांनी आंदोलनाची आयडिया आम्हाला शिकवू नये, दगड मारून सभा, बंद करणारे आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे आम्ही खरे शिवसैनिक आहोत याची अक्कल त्यांनी आम्हाला राऊत यांनी शिकवू नये, असेही यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.