जळगाव जिल्हाराजकारण

या सरकारची युती कशी आहे? मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 28 ऑगस्ट 2023 | राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्या महिन्यात अजित पवार यांनी समर्थक आमदारांना घेऊन सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राज्यात सत्तेत आता एकूण तीन पक्ष झाले आहेत. मात्र, हे सरकार कसं आहे? या सरकारची युती कशी आहे? यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मार्मिक शब्दात वर्णन केलं आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील
तुम्ही मंत्री असताना तरी एकच सरकार होते. मात्र आमचं तीनजणांचे सरकार आहे. वरती भाजप, कंबर शिवसेनेचे आणि हातपाय राष्ट्रवादीचे असं चाललं आहे आमचं, अशी मार्मिक टिप्पणी गुलाबराव पाटील यांनी केली.जळगाव येथील बादली येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली.

आधी हेच राष्ट्रवादीवाले आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणून टीका करत होते. आता अजितदादा आमच्याकडे आले तर यांची बोलती बंद झाली. यांचे आता तोंड उघडत नाही, अशी जोरदार टीकाही गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर केली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनिल भाईदास पाटील यांचा या संबंधितांनी सत्कार केला. आणि हे स्वतःला शरद पवार गटात असल्याचं दाखवतात. हे कसले शरद पवार गटात? आदेश शरद पवारांचे की अजित पवारांचे हे सिद्ध करा? असं आव्हानच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button