⁠ 
सोमवार, मे 20, 2024

लाच भोवली! पारोळा पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातून लाचखोरीची आणखी एक बातमी समोर आलीय. पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आठ हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. जयवंत प्रल्हाद पाटील (वय-५४) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून या कारवाईने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नेमका काय आहे प्रकार?
धुळे जिल्ह्यातील अंचाळे येथील तक्रारदार यांच्यासह व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलिसात गुन्हा रजि. नंबर 344/2023, भादंवि कलम 324, 323, 341, 342, 427, 504, 506, 34 प्रमाणे 12 ऑगस्ट 2023 राजी गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोप पत्र लवकर न पाठविण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली. यापुर्वी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपये घेतले. उर्वरित १० हजार नंतर घेवून असे सांगितले.

दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी सापळा रचला. यात तक्रारदाकडून तडजोडअंती ८ हजारा रूपये स्विकारतांना पोलीस उपनिरीक्षकाल रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.