मोठी बातमी! चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित ; प्रकरण काय?

जुलै 28, 2025 10:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलीय. जिथे एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणावरुन पकडलेल्या तीन मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करुन त्यांना परस्परांशी लैंगिक चाळे करायला लावला. लावल्याप्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. सज्जनसिंह नार्हेडा असं निलंबित केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

Sajjan Singh Narheda

काय आहे प्रकार?

चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून या तिघा तरुणांना पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडाने पोलीस ठाण्यात बोलावले होते.त्यानंतर तीन तरुणांना अंगावरचे कपडे काढून, तिन्ही तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करून नग्न व्हायला सांगून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा घाणेरडा प्रकार पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात केल्याचे म्हटले जात आहे. एका महिलेला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे.

Advertisements

या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव सज्जनसिंह नार्हेडा असून या घटनेनंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी तसेच एका संघटनेने तक्रार केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करुन त्याची चौकशी करण्यात येत आहे.

Advertisements

विभागीय चौकशी सुरू

संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणांच्या कुटुंबीयांसह एका संघटनेने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात येऊन त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती समोर आलीय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now