---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा जळगाव शहर

चिमुकलीसह आत्महत्येचा विचार करणाऱ्या मायलेकीचा पोलिसांनी वाचवला जीव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । मेहरूण तलाव परिसरात चिमुकलीसह आत्महत्येच्या विचारात फिरत असलेल्या विवाहितेची उदासिन मनस्थिती वेळीच लक्षात घेत जळगाव एमआयडीसी पोलिसांनी तिला आत्महत्येच्या निर्णयापासून पराव्रुत्त केले. पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानमुळे मायलेकीचा जीव वाचला आहे.

images 1 23 jpeg webp

जळगाव शहरातील नाथ वाडा परिसरातील एक महिला शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या ५ वर्षीय मुलीसह उद्विग्न अवस्थेत फिरत होती. महिला वारंवार तलावाजवळ जात असल्याने तिचा आत्महत्या करण्याचा विचार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी दुर्गा विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना आला.

---Advertisement---

त्या ठिकाणी असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, श्रीराम बोरसे, विश्वास बोरसे, जितेंद्र राजपूत, महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी घेटे, विनिता राजपूत यांनी तिची समजूत काढून तिला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. विवाहितेच्या नातेवाईकांशी चर्चा करून तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या या लाख मोलाच्या कामाचे नाथवाडा परिसरातील नागरिकांसह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनीही देखील त्यांचे कौतुक केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---