---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जळगावात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ; तीन महिलांची सुटका, पाच जण ताब्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज ८ मे २०२५ । एकीकडे जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून त्यातच जळगाव शहरात कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तीन महिलांची सुटका दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

kunthkhana crime jpg webp

जळगाव शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेज जवळ एक महिला ही स्वतःच्या फायद्यासाठी काही महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. तशी परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

---Advertisement---

शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी ४वाजता या ठिकाणी सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालणाऱ्या दांपत्यासह एक असे 3 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर येतील तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि या ठिकाणी असलेले गिऱ्हाईक म्हणून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण पाच संशयित आरोपी आहेत तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment