जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम गावात गालापूर रोडजवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १ लाख २१ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमालासह १५ जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती की, एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम गावातील गालापूर रोडला लागून असलेल्या काटेरी झुडपांच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत आहे. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत यांनी तातडीने पो.ना. प्रदीप पाटील, पोकॉ.समाधान तोंडे, पोकॉ. निलेश नाना गायकवाड आणि पोकॉ. योगेश पाटील यांना कारवाईसाठी रवाना केले.

यावेळी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळापासून काही अंतरावर वाहने थांबवून पायी जाऊन काटेरी झुडपांच्या आडोशाला पाहणी केली. त्यावेळी काही इसम जमिनीवर बसून घोळका करून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यांनतर या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.त्यांच्या अंगझडतीतून, पत्त्यांच्या डावातून रोख ६ हजार ३९० रुपये आणि १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोकॉ. ५०१ दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली अटक?
या छाप्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोनू धाकु भिल (वय ५०), विरभान श्रावण भिल (वय ४०), राहुल संतोष सोनवणे (वय २६), प्रवीण वसंत सोनवणे (वय ३९), संतोष माधव सोनवणे (वय ३०), सुनील दगा ठाकरे (वय ३५), मंगिलाल भाईदास चव्हाण (वय ४५), रतन धाकु भिल (वय ६०), अशोक गोविंदा पाटील (वय ५४), सचिन बापू पवार (वय ३७), कांतीलाल महादू सोनवणे (वय ३८), उत्तम बालाअप्पा जेढे (वय ५०), समाधान बापू पाटील (वय ३५), संभाजी महारु पाटील (वय ५८) आणि सुनील सीताराम वाघ (वय ४८), हे सर्व जवखेडे सिम, ता. एरंडोल, जि. जळगाव येथील रहिवासी आहेत.










