जळगाव लाईव्ह न्यूज | २६ एप्रिल २०२३ | रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहेत. संशयित चोरांकडून तब्बल ३१ सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पो.ना. रेवानंद साळुंखे, रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोननी, दिपक वंजारी यांनी कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी व विजय खैरे करीत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, गिरीश गोविंदा खैरकर (वय-२२) रा. गणेश पार्क शिवकॉलनी, जळगाव या तरूणाची सायकल २१ डिसेंबर २०२२ रोजी सायकल चोरी गेली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह इतर ठिकठिकाणी सायकली चोरीचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिले होते.
त्यानुसार रामांनद नगर पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. गोपनिय माहितीनुसार जयेश अशोक राजपूत (वय-२२) रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव याने या सायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी संशयित आरोपी जयेश याला २१ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीच्या एकुण ३१ सायकली काढून दिल्या.