⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

हादरवून सोडणारी घटना! पोलीस अधिकाऱ्याने आधी पत्नी-पुतण्यावर गोळी झाडली, नंतर..

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२३ । पुण्यातुन हादरवून सोडणारी एक समोर आलीय. यात अमरावतीचे एसीपी भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडली, त्यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळी झाडली. पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून या धक्कादायक घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३५) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत.

यादरम्यान भारत गायकवाड यांनी आई व मुलगा सुहासला एका खोलीत बंद केलं. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पत्नी मोनी गायकवाड हिच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरने गोळी झाडली. खोलीतून गोळीबाराचा आवाज ऐकून पुतण्या दीपक गायकवाड हा धावत येऊन तेथे पोहोचला असता भारत गायकवाड यांनी त्याच्यावरही गोळी झाडली. त्यांनतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने पुणे शहर हादरले पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर मुलगा सुहास याने तातडीने याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत तिघांनाही जवळच्या ज्युपिटर रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. या घटनेत परवाना असलेली रिव्हॉल्व्हर वापरली की अन्य कोणती याचा तपास पोलीस करत आहेत.

भरत गायकवाड यांना नुकतीच बढती मिळाली होती :
भरत गायकवाड हे अमरावती शहरातील राजापेठ विभागाचे एसीपी होते. नुकतेच ते वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी बढती घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) झाले आणि त्यांची अमरावती येथे नियुक्ती झाली.