---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

एसआरटी, क्यूआरटी पथकांसह स्ट्रायकिंग फोर्स मैदानात; असा आहे जळगावात पोलीस बंदोबस्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ सप्टेंबर २०२३ | लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली जळगाव शहरासह जिल्हाभरात गणपती विसर्जन मिरवणूकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्दशीला जिल्ह्यातील एक हजार ३६३ सार्वजनिक गणेश मंडळे, ५०४ खासगी, तर १११ ‘एक गाव, एक गणपतीचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये व मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरासह जिल्हाभरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

maharashtra police jpg webp

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दलाकडून पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, अंमलदार (पुरुष), अंमलदार (महिला), आरसीपी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, क्युआरटी पथक तैनात राहील. तसेच मिरवणुकांवर ड्रोनची नजर देखील राहणार आहे. यासाठी विशेष तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली आहे.

---Advertisement---

असा आहे पोलीस बंदोबस्त

एसआरपी : १ कंपनी

स्ट्रायकिंग फोर्स : १०

नवप्रविष्ट कर्मचारी : २००

नवप्रविष्ट महिला : १००

पुरुष होमगार्ड : १२९४

महिला होमगार्ड : १८३

पोलीस अधिक्षक : १

अपर पोलीस अधिक्षक : २

पोलीस उपअधीक्षक : १०

पोलिस निरीक्षक : ३३

सपोनि./ पोउनि : १४४

आरसीपी : ८

दामिनी पथक : ३

क्युआरटी : २

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---