⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

विष प्राशन केलेल्या त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 4 जानेवारी 2023 : विषारी द्रव प्राशन केलेल्या जतीन श्याम लेहलकर (२०, रा. चौगुले प्लॉट) या तरुणाचा बुधवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चौगुले प्लॉट परिसरातील जतीन लेहलकर याने तीन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर तो ममुराबाद रोड परिसरात असलेल्या मंदिराजवळ गेला. याठिकाणी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने वडिलांना फोन करुन आपण विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती दिली. त्याच्या वडिलांनी तत्काळ त्या ठिकाणी जावून जतीन याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. विषारी द्रव्य प्राशन केल्यामुळे जतीन याची प्रकृती चिंताजनक होती.

दोन दिवसांपासून त्याच्यावर जीएमसीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. मयत जतीन लेहलकर हा कष्टाळू व मनमिळावू होता. लहानपणापासूनच तो वडिलांना व्यवसायात मदतदेखील करीत होता. त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे आई- वडिलांसह भावाला मानसिक धक्का बसला आहे