भारत विकास परिषदेतर्फे स्वातंत्र दिनानिमित्त २५ वृक्षाचे रोपण
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । श्रीराम मंदिर संस्थान पिंप्राळा यांचे मानराज पार्क येथे असलेल्या मैदानाच्या चौफेर नैसर्गिक प्राणवायू देणारे वृक्ष जोपासण्यासाठी पुढाकार घेत भारत विकास परिषदेने २५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त पंचवीस वृक्षांचे रोपण केले. गेल्या वर्षी कोविड परिस्थितीत अनेकांना प्राणवायू मुळे प्राण गमवावे लागले. समाजाच्या विकासासाठी सेवाभावी कार्य करणार्या भारत विकास परिषदेने ही हानी भरून काढण्याचा निश्चय केला असून वृक्षारोपण मोहीम हाती घेत आज स्वातंत्र दिनानिमित्त श्रीराम मंदिर संस्थानाच्या मानराज पार्क येथे असलेल्या मैदानाच्या चौफेर भागात ज्येष्ट व नूतन सदस्यांच्या हस्ते २५ वृक्ष रोपण केले. नुसतेच वृक्षारोपण न करता त्याच्या संवर्धनासाठी ठिबक सिंचनची नळी लावून दिलेली आहे जेणेकरून झाडाला वर्षभर पाणी दिले जाईल. सोबत मोकाट जनावरांपासून झाडांचे संरक्षणार्थ ताराची जाळी सुद्धा लावलेली आहे. या झाडांचे पालकत्व तिथेच बाजूला रहिवासी असलेले भारत विकास परिषदेचे सचिव श्री उमेश पाटील यांनी घेतलेले आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रकल्प प्रमुख तुषार तोतला,अध्यक्ष उज्वल चौधरी सचिव उमेश पाटील, श्रीराम मंदिर संस्थान पिंप्राळा चे विश्वस्त जगदीश जखेटे तसेच भारत विकास परिषदेचे तुषार तोतला परिवार,मिनेश शाह परिवार, विठ्ठल काबरा परिवार, विशाल देशमुख परिवार, महेश जडिये परिवार, उज्ज्वल चौधरी परिवार, उमेश पाटील परिवार, संजीव पाटील परिवार रत्नाकर गोरे परिवार, दिपक सेठ परिवार,रवींद्र लड्ढा परिवार, नंदकुमार जैस्वाल परिवार , श्रीहर्ष खाडिलकर परिवार, डॉक्टर विकास चौधरी , गुरवजी संतोषजी इंगळे , भारत पाटील , ज्ञानेश्वर पाटील, केदारनाथजी मुंदडा, प्रशांत गुजराती , राजेश नाईक, दीपक खडके, डॉक्टर योगेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांनी मातेचे पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रकल्प प्रमुख तुषार तोतला ह्यांनी आभारप्रदर्शन सचिव उमेश पाटील यांनी केले.