जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२१ । यावल तालुक्यातील कोळवद येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रज्ञा इंटरप्राईजेस कराड यांच्या मदतीने व श्री प्रसाद फाउंडेशन कोळवद यांच्या सहकार्याने गावातील अंगणवाडी व स्मशानभूमी परिसरात पर्यावरणमित्र प्रा. डॉ. पी.एस.देशमुख संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
या प्रसंगी सोबत प्रा.पी.एम.सोनवणे मुक्ताईनगर श्री.वानखेडे, श्री प्रसाद फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन बर्डे, सचिव भारती बर्डे, अंगणवाडी सेविका, सैनिक सचिन कोळी गावाचे सरपंच याकूब तडवी तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पर्यावरणमित्र प्रा.डॉ.पी.एस.देशमुख यांनी आपल्या मनोगतात झाडांचे महत्त्व व उपयोग आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाची भूमिका अत्यावश्यक आहे, कोरोना काळात आँक्सिजनचे महत्त्व काय आहे.
हे सर्वाना समजले म्हणून एक व्यक्ती एक झाड लावून जगवलेच पाहिजे असे या वेळी सांगितले. त्याच बरोबर श्री प्रसाद फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन बर्डे यांनी एक हजार वृक्षांचे रोपण परिसरातच आपण करणार आहोत आणि विशेष लक्ष देऊन ते जगवणार आहे असे मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केले.