जळगाव शहर
केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वृक्षारोपण
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सहसंचालक प्रा. सतीश देशपांडे यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
त्यांनी कोरोना च्या काळात झाडांपासून मिळणारे ऑक्सिजन मानवी जीवनासाठी महत्वाची गरज आहे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्राचार्य नाना गायकवाड (कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भडगाव), प्राचार्य लता मोरे (नवापूर), प्राचार्य यादव सनेर (धुळे), डॉ.आरती सपकाळे (धुळे), प्रा. मनोहर सुरवाडे (फैजपूर), प्राचार्य साहेबराव भुकन (खिरोदा ), प्रा. प्रमोद अहिरे (भुसावळ), प्राचार्य अशोक राणे, डॉ.शैलजा भगाळे, मोहन चौधरी इत्यादी उपस्थित होते.