जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला महागला आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पितृपक्षामध्ये भाजीपाल्याची मागणी देखील वाढली आहे. यामुळे संपूर्ण बाजारात भाजीपाला महाग झाला आहे.
सतत बरसत असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचा साठा होणे कठीण झाले आहे. यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. पर्यायी सरसकट भाजीपाला तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी महागला आहे. पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अशावेळी भाजीपाला अजून महाग होऊ शकतो असा अंदाज भाजीपाला विक्रेते वर्तवत आहेत.
यंदा संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यात पाणी साचत आहे. यामुळे भाजीपाला नासला जात आहे. अशावेळी बाजारामध्ये केवळ बटाटे, टोमॅटो आणि वांग या भाज्या जास्त करून दिसत आहेत. मात्र इतर महत्त्वाच्या भाज्या जशा की भोपळा, फ्लॉवर, वटाणे, कोबी, शेवग्याच्या शेंगा, भेंडी, शिमला मिरची अशा भाज्यांचे दर आवक कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
भोपळा, फ्लॉवर, वटाणे, शेवग्याच्या शेंगा या भाज्यांनी तर तब्बल शंभरी ओलांडली आहे. प्रति किलो 120 रुपये सर्वसामान्य नागरिकांना या भाज्या विकत घेण्यासाठी मोजावे लागत आहेत. याचबरोबर पालेभाज्या जसे की कोथिंबीर, पालक यादेखील महागल्या आहेत. यांच्यासाठी देखील नागरिकांना शंभरहून अधिक रुपये मोजावे लागत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड पाऊस पडला आहे. पर्यायी हा सर्व भाजीपाला ठेवायचा कुठे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यामुळे भाजीपालाची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
हर्षल चौधरी, भाजीपाला विक्रेते.
भाजी – पाल्याचे दर.
भोपळा – १२०
फ्लोवर-१२०
वाटणे-१२०
शेंगा शिवगा – १२०
टोमॅटो -६०
वांगी – ४०
कोबी – ४०
भेंडी – ४०
शिमला मिरची – ४०