जळगाव लाईव्ह न्यूज । 3 जुलै 2022 । अमळनेर येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहण व शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न झाला. तसेच पिंक बॉक्स ही नवीन संकल्पना कार्यरत करण्यात आली. मंचावर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, संस्थेचे संचालक पराग पाटील, प्राचार्य विकास चौधरी, रेखा ईशी व नम्रता जरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
शालेय शिस्त टिकवण्यासाठी व शाळेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहो, उद्याची सक्षम पिढी घडविण्यासाठी व राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करण्याची शपथ यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींना प्राचार्य विकास चौधरी यांच्या तर्फे देण्यात आली.
विद्यार्थी चिराग वाघ, विद्यार्थिनी श्रेया चंदनखेडे, क्रीडा विभाग प्रमुख सागर पावरा, क्रीडा प्रमुख ग्रीष्मा पाटील, सांस्कृतिक प्रमुख दर्शन पाटील, विद्यार्थिनी सांस्कृतिक प्रमुख नंदिनी पाटील, तसेच ब्ल्यू हाऊस, ग्रीन हाऊस, रेड हाऊस, सॅपरॉन हाऊस, यांचे प्रभारी वर्षा चुंबळकर मॅडम, विशाल सूर्यवंशी सर, जयश्री भोसले मॅडम, कविता चौधरी मॅडम, यांचे अभिनंदन करण्यात आले व हाऊस कॅप्टन हर्षल धोत्रे, हर्षवर्धन पाटील, प्रणव चौधरी, विराग जैन, यांचेही अभिनंदन करण्यात आले.
जयपाल हिरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत आजच्या युगातील तरुण युवक युवतींना समाजातील वर्तवणुकी संबंधित मोलाचे मार्गदर्शन केले व भावी शैक्षणिक कार्यकर्तीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच दामिनी पथकातील जरे मॅडम व इसी मॅडम यांनी मुलींवर होणाऱ्या अत्याचार अथवा काही तक्रार असल्यास तक्रारपेटी पिंक बॉक्स या संकल्पनेची विद्यार्थिनींना माहिती दिली शाळेला पिंक बॉक्स भेट देऊन मुलींचे मनोबल वाढवले या कार्यक्रमास संचालक पराग पाटील प्राचार्य विकास चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्राध्यापक अश्विनी चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन मंगला चौधरी मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक केदार देशमुख व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.