जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । अभियंता असलेल्या युवक शेतकऱ्याने निर्यातक्षम केळीचे उत्पादन आणि चांगली गुणवत्ता ठेवत केळीला थेट अबुधाबीच्या बाजारात निर्यात केली.
अधिक असे की, पिंप्रीसेकम येथील नीलेश पाटील या तरुणाने दीड एकरावर केळीची लागवड केली आहे. गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीर येथे ३०० क्विंटल केळी पाठवल्यानंतर दाेन दिवसांपूर्वी त्यांनी अबुधाबीच्या बाजारात १५० क्विंटल केळीची निर्यात केली आहे. निर्यातक्षक केळी असल्याने त्यांना स्थानिक बाजारपेक्षा दुप्पट म्हणजे १२०० रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. नीलेश पाटील हे गेल्या तीन वर्षांपासून केळीची लागवड करीत आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादन असल्याने त्यांनी केळी निर्यातीचा निर्णय घेतला. स्थानिक निर्यातदारांनी साठी सहकार्य केले.