जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । पिंपळगाव हरेश्वर येथील अभिनेता योगेश महाजन यांनी आपल्या शेतात साई भक्तांसाठी श्री.साईंचे मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकार अभिनेता महाजन यांच्या शेतात असलेले साई मंदिरास भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली आहे.
पिंपळगाव हरेश्वर येथील अभिनेता योगेश महाजन यांनी आपल्याला दर वर्षी साई बाबांच्या भेटीला शिर्डी येथे जाता येणार नाही म्हणून, त्यांनी आपल्या शेतात साई भक्तांसाठी सुंदर असे श्री.साईंचे मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे अभिनेता योगेश महाजन याचे मित्र मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा कलाकार सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखाताई सुभेदार, सुप्रसिद्ध अभिनेता पॅडी कांबळे, डबिंग आर्टिस्ट गणेश दिवेकर, डबिंग आर्टिस्ट पंकज कालरा, डबिंग आर्टिस्ट माधवी अस्तेकर, डबिंग आर्टिस्ट अनन्या यांनी अभिनेता योगेश महाजन यांच्या शेतातील साई मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त उपस्तित, राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.