⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; महिलेची माहेरीच राहण्याचा कादेशीर काडीमोड

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा येथे माहेर व जळगाव येथे सासर असलेल्या विवाहितेच्या गेल्या काही वर्षांपासून पतीसह सासऱ्यांच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ सुरु होता. नेहमीच होंणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर सदर पीडित महिलेने माहेरिच  राहण्याचा व कादेशीर काडीमोड घेण्याचा निर्णय घेऊन न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया सुरु केलीली आहे.

न्यायलयात आपल्या विरुद्ध निकाल लागला तर कायदेशीर रित्या आपल्या मालमत्तेमधील काही भाग महिलेला द्यावा लागेल असे होऊ नये, यासाठी पीडित महिलेकडे व तिच्या नावे कोणतीही स्थावर व जंगम मालमत्ता नाही असे न्यायलायत भासविण्याचा पती व सासरच्या मंडळींनी वडिलपार्जीत मालमत्ता विकण्याचा प्रयन्त सुरु केला आहे. यावर महिलेने आक्षेप घेतला आहे. असे पीडित महिलेने माध्यमांशी बोलतांना सांगितले.

सदर महिला रा. सिंधी कॉलनी, रामनगर जळगाव, हल्ली मुक्काम सिंधी कॉलनी, पाचोरा जि. जळगाव यांचा विवाह जळगाव येथील संजय गुरुमदास रामचंदानी यांच्याशी झाला होता. विवाह झाल्यानंतर वैवाहिक जीवन सुरळीत सूर होते. परंतु, कालांतराने एकत्रिक कुटुंब असल्याने पतीसह जसादाबाई गुरुमुखदास रामचंदनी (सासू ) नरेश गुरुमुखदास रामचंदनी ( दीर ) दीप नरेश चांरामचंदनी (देरानी ) महेश गुरुमुखदास रामचंदनी ( दीर )भारती गुरुमुखदास रामचंदनी ( देरानी ) राजेश गुरुमुखदास रामचंदनी  ( दीर )व संजना राजेश रानचंदनी (देरानी ) सर्व रा. सिंधी कॉलनी , जळगाव या सर्वांनी करीना रामचंदनी हिची काही एक चूक नसतांना महिलेचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. पीडित करीना मुलांकडे बघून त्यांचे अत्याचार सहन करत राहिली. परंतु नियमित होत असलेल्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने आपल्या मुलासह पाचोरा येथील वडिलांकडे माहेरी वास्तव्यास आली आहे.

दरम्यान, महिला हि, सासरी (जळगाव ) येथे नसल्याचा फायदा घेत पती संजय गुरुमुखदास रामचंदनी व परिवारातील सर्वच सदस्यांन्नी वडिलपार्जीत मालमत्ता विकण्याचा प्रयत्न चालविला असून त्यास हरकत आहे. सासरच्या मंडळीनीं सर्वप्रथम जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुल जळगाव येथील गाळा -३ हा कवडीमोल भावात विक्री काढला असून याबाबत सदर महिलेची हरकत आहे. तसेच सततच्या या त्रासामुळे पीडित करीना चे आई – वडीलांसह इतर समक्ष सदस्यांनी या रामचंदनी परिवाराशी नातेसंबंध न ठेवण्याचा प्राथमिक निर्णय घेतला असून, याबाबत दोघे परिवारात न्यायालयीन प्रक्रिया सुरु झालेली आहे.

सध्य:स्थितीत दोघेही परिवारात न्यायप्रविष्ठ बाब सुरु असल्याने या न्यायालयीन प्रक्रियेशी संपूर्ण प्रक्रिया व निकाल लागेपर्यंत त्याच्या मालकीच्या सर्वच मालमत्ते मध्ये करीनाच्या त्यांच्या बरोबरिचा वाट असल्याने सदर गाळा करीनाच्या इच्छेविरुद्ध विकण्यास काढलेला असल्याने याला करीनाची हरकत आहे. तरी कुणी हा गाळा व या परिवाराची इतर प्रॉपर्टी खरेदी, विक्री प्रक्रियेत भाग घेतल्यास पुढील कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार असे करीना रामचंदनी यांनी माध्यमांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट  केले आहे.