दिवाळीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलमध्ये तेल कंपन्यांनी दिला मोठा दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरतेचे वातावरण आहे. एकेकाळी क्रूड 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले होते. मात्र त्यानंतर ओपेक देशांकडून उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रूडच्या किमतीत पुन्हा वाढ झाली. दरम्यान, भारतातील पेट्रोलिम कंपन्यांनी आजचा पेट्रोल आणि डिझेलचा नवीन दर जाहीर केला आहे. Petrol Diesel Rate Today
गेल्या पाच महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात तेल कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मे 2022 रोजी केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करून महागड्या तेलापासून दिलासा दिला. सरकारने उचललेल्या पावलांमुळे देशभरात पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यावेळी महाराष्ट्रमध्येही व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.
सध्या जळगाव शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे 107. 10 रुपये आहेत तर डिझेल 95 रुपयापर्यंत आहे.
राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर
अहमदनगर १०६.६४ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.१५, डिझेल (प्रति लिटर )
अकोला १०६.३७ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.९१, डिझेल (प्रति लिटर )
अमरावती १०७.४४ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.९४, डिझेल (प्रति लिटर )
औरंगाबाद १०६.४२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.९३, डिझेल (प्रति लिटर )
भंडारा १०७.०१ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.५३, डिझेल (प्रति लिटर )
बीड १०७.९६ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.४२ ,डिझेल (प्रति लिटर )
बुलढाणा १०६.९६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४८ डिझेल (प्रति लिटर )
चंद्रपूर १०६.१२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६८ डिझेल (प्रति लिटर )
धुळे १०६.१३ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६६ डिझेल (प्रति लिटर )
गडचिरोली १०६.९२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४५ डिझेल (प्रति लिटर )
गोंदिया १०७.५३ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.०२ डिझेल (प्रति लिटर )
हिंगोली १०७.०६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.५८ डिझेल (प्रति लिटर )
जालना १०७.९१ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३६ डिझेल (प्रति लिटर )
कोल्हापूर १०७.४५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.९४ डिझेल (प्रति लिटर )
लातूर १०७.२५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.७४ डिझेल (प्रति लिटर )
मुंबई शहर १०६.३१ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.२७ डिझेल (प्रति लिटर )
नागपूर १०६.०४ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.५९ डिझेल (प्रति लिटर )
नांदेड १०७.८४ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३३ डिझेल (प्रति लिटर )
नंदुरबार १०७.२२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.७१ डिझेल (प्रति लिटर )
नाशिक १०६.५१ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.०२ डिझेल (प्रति लिटर )
उस्मानाबाद १०६.९२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४३ डिझेल (प्रति लिटर )
पालघर १०६.०२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.५१ डिझेल (प्रति लिटर )
परभणी १०८.५० पेट्रोल (प्रति लिटर) ९४.९३ डिझेल (प्रति लिटर )
पुणे १०६.२२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.७३ डिझेल (प्रति लिटर )
रायगड १०५.७७ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.२८ डिझेल (प्रति लिटर )
रत्नागिरी १०७.६५ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.१४ डिझेल (प्रति लिटर )
सांगली १०६.०५ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६० डिझेल (प्रति लिटर )
सातारा १०६.७६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.२८ डिझेल (प्रति लिटर )
सिंधुदुर्ग १०७.९७ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.४५ डिझेल (प्रति लिटर )
सोलापूर १०६.७७ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.२९ डिझेल (प्रति लिटर )
ठाणे १०६.३८ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३४ डिझेल (प्रति लिटर )
वर्धा १०६.५३ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.०६ डिझेल (प्रति लिटर )
वाशिम १०६.९५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४७ डिझेल (प्रति लिटर )
यवतमाळ १०७.३९ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.८९ डिझेल (प्रति लिटर )
कच्चे तेल नवीनतम दर
गुरुवारी सकाळी WTI क्रूड $85.89 आणि ब्रेंट क्रूड $92.26 प्रति बॅरल वर दिसले. आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारी मालकीच्या तेल कंपन्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर दररोज तेलाच्या किमती जारी करतात.