⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Petrol-Diesel Today : पेट्रोल-डिझेलचा नवीन दर जाहीर; जाणून घ्या प्रति लिटरचा दर

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जुलै २०२२ । तेल कंपन्यांकडून आज मंगळवारी इंधनाचा नवीन दर जाहीर झाला आहे. त्यानुसार गेल्या जवळपास दोन महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय आज जाहीर झालेल्या दरानुसार जळगावमध्ये पेट्रोल आता 107.60 प्रति लिटरवर आले आहे. तर दुसरीकडे डिझेल 94.03 रुपये प्रति लिटरवर आलेय. Petrol Diesel Rate Today

पेट्रोल, डिझेलचे दर 22 मे पासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दोन दिवसापूर्वी पेट्रोलच्या दरात ५ रुपयाची तर डिझेल दरात ३ रुपयाची कपात करण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरूच आहे. मात्र दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या किमती देशात स्थिर असल्यामुळे याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. त्यांच्या मार्जीनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलपंपाना करण्यात येणारा इंधनाचा पुरवठा कमी केला आहे. दरम्यान दुसरीकडे सौदी अरेबियाने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढीचा निर्णय घेतल्याने येत्या काळात पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. महानगरातील इंधनाच्या दराची तुलना करायची झाल्यास अद्यापही सर्वात महाग पेट्रोल हे मुंबईमध्ये तर सर्वात स्वस्त पेट्रोल दिल्लीमध्ये मिळत आहे.