महाराष्ट्रातील जनतेला दिलासा; पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त.. आता काय आहे एक लिटरचा दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२३ । मागील अनेक महिन्यापासून देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तरी देखील पेट्रोल शंबर रुपायांवर आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण असून देखील सरकारकडून देशवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत नाहीय. दरम्यान, आज शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आज महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळाला आहे. Petrol Diesel Rate Today

आज महाराष्ट्रात पेट्रोलचा स्वस्त झाल्याचे वृत्त एका राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे. आज पेट्रोल दर 1.02 रुपयांनी कमी होऊन 106.15 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेल 99 पैशांनी घसरून 92.67 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे, मात्र, याशिवाय अनेक राज्यांमध्ये इंधन महाग झाले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकातही इंधनाचे दर वाढले आहेत.

आज शनिवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. आज WTI क्रूड $ 2.15 किंवा 2.74 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 76.34 वर व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड देखील $ 2.14 (2.51%) ने घसरून $ 83 वर आले आहे. देशातील तेल कंपन्यांनी दररोज सकाळप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाल्याचे दिसत आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.