जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 16 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यानुसार कंपन्यांनी सलग ४० दिवसांपासून इंधनाचे (Fuel Rates) दर जैसे थे ठेवले आहे. आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय. दर गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून स्थिर असल्यानं इंधनाचे दर आता कमी होणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.
आज जाहीर झालेल्या दरानुसार जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे.
सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी येथे 123.47 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याच वेळी, आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये सर्वात महाग डिझेल 107.61 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय पोर्ट ब्लेअरमध्ये स्वस्तात पेट्रोल-डिझेल मिळत असेल तर. येथे पेट्रोलची किंमत 91.45 रुपये आणि डिझेलची किंमत 85.83 रुपये आहे.
जाणकारांनी आधीच किमती वाढू शकतात याचा अंदाज वर्तवला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात. तेल कंपन्यांनी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यादरम्यान केवळ 15 दिवसांत तब्बल 14 वेळा इंधन दर वाढवण्यात आला होता. या 14 दिवसांत एकूण 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली होती. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल 105 तर मुंबईत 120 रुपये प्रति लीटर आहे. क्रूड दर 110 डॉलरच्या खाली असल्याने भारतात इंधन दरात कोणतीही वाढ केली नसल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे.
तुमच्या शहराचे दर येथे जाणून घ्या
दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल १०५.४७ रुपये आणि डिझेल ९७.०३ रुपये प्रति लिटर
लखनौमध्ये पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर
पाटण्यात पेट्रोल 116.23 रुपये आणि डिझेल 101.06 रुपये प्रति लिटर
कर कमी करण्यासाठी निदर्शने
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास सांगितले होते. त्यांनी राज्यांना राष्ट्रहितासाठी कर कमी करण्याचे आवाहन केले. यानंतर राजधानी दिल्लीत भाजपने सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने केली. भाजपने दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी केली.