⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

दिलासादायक ! महाराष्ट्रात आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त ; लगेचच तपासा प्रति लिटरचा नवा दर

जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या राज्यातील सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल दर कमी झाले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel)व्हॅट कमी करण्याची मोठी घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटरमागे पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे जळगावमध्ये पेट्रोल आता 107.60 प्रति लिटरवर आले आहे. तर दुसरीकडे डिझेल 94.03 रुपये प्रति लिटरवर आलेय. Petrol Diesel Rate Today

केंद्राकडून यावर्षी 21 मेला पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्थ झाले होते. केंद्रप्रमाणेच अनेक राज्यांनी देखील पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र महाराष्ट्रात व्हॅट कमी करण्यात न आल्याने पेट्रोल, डिझेलचे दर सर्वाधिक होते. व्हॅट कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. नवे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॅट कपातीची घोषणा केली आहे. व्हॅट कमी करण्यात आल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे.

नवे दर आजपासून लागू झाले आहेत. नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात मात्र पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इतर राज्यात इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.