⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Petrol Diesel Today : कंपन्यांकडून इंधनाचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज सलग 50 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे.

आज शनिवारी जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.

दरम्यान, रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढतच आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरू असताना देखील देशात गेल्या 50 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. मार्जीनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.