जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. मात्र तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सलग 35 व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय. त्यामुळे आज जळगावात पेट्रोलचा दर १११.२९ रुपये प्रति लिटर इतका आहे. तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे.
मोदी सरकारनं 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यानंतर 4 नोव्हेंबरपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ओमिक्रॉनचे संकट निवळल्यानंतर जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारला आहे.
इतर बड्या शहरातील दर?
आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर ८ रुपये कपात करण्यात आली होती. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे.
मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.