जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । महागाईच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये ५ रुपये तर डिझेलवर १० रुपयांची कपात करण्याची घोषण केली होती. त्यामुळे काल दिवाळीच्या दिवशी दोन्ही इंधनाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जळगाव शहरात शहरात पेट्राेल ५ रुपये ८२ पैशांनी तर डिझेल १२ रुपये १६ पैशांनी घसरले. यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इंधनाच्या दरात आणखी घट हाेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या दाेन महिन्यांपूर्वी शंभरी गाठलेल्या पेट्राेलचे दर बुधवारी रात्रीपर्यंत ११७ रुपये ११ पैसे तर डिझेलचे दर १०६ रुपये १८ पैसे हाेते. त्यात केंद्र शासनाने अबकारी शुल्क घटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंधनाचे दर कमी हाेणार असल्याने वाहनधारक काहीअंशी का असेना पण समाधानी आहेत. केंद्र शासनाच्या घाेषणेप्रमाणे गुरुवारी सकाळी पेट्राेल पंपांवर नवीन दरानुसार विक्री सुरू झाली. पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर विक्री झाले.
मागील ३० दिवसात जळगावात पट्रोल दरात तब्बल ७ रुपयाची वाढ झाली होती. तर डिझेल च्या दरात जवळपास ६ रुपयाची वाढ झाली होती. दरम्यान, आज शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी दोन्ही इंधन दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.