जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाहीय. रविवारपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 ते 15 पैशांची घट पाहायला मिळाली होती.
जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे.
मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे.
दररोज 6 वाजता बदलतात किमतीदररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.