जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला इंधन दर कपात करून ग्राहकांना सुखद धक्का देणाऱ्या कंपन्यांनी दर कपातीला ब्रेक लावला आहे. आज मंगळवारी सलग सातव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.३८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.८५ रुपये इतका आहे.
देशभरातील सुमारे 19 राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या आठवड्यापूर्वी मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात किमतीमध्ये 15 पैसे प्रति लीटरचा दिलासा मिळाला होता. तेव्हापासून किमती स्थिर आहेत.
IOCL दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीमध्ये बदल करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत फक्त एका एसएमएसद्वारे तपासू शकता.
>>जळगाव पेट्रोल 108.38 रुपये आणि डिझेल 95.85 रुपये प्रति लीटर आहे
>> दिल्ली पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 88.92 रुपये प्रति लीटर आहे
>> मुंबई पेट्रोल 107.52 रुपये आणि डिझेल 96.48 रुपये प्रति लीटर आहे
>> चेन्नई पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर आहे
>> कोलकाता पेट्रोल 101.82 रुपये आणि डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर आहे
>> नोएडा पेट्रोल 98.79 रुपये आणि डिझेल 89.49 रुपये प्रति लीटर आहे
>> जयपूर पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 98.06 रुपये प्रति लीटर आहे
>> भोपाळ पेट्रोल 109.91 रुपये आणि डिझेल 97.72 रुपये प्रति लीटर आहे