जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कालदेखील देशभरात इंधनाचे दर स्थिर होते.
दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.३८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.८५ रुपये इतका झाला आहे.
मागील गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल शंभरी पार गेलं तर डिझेल शंभरीच्या उंबरवठ्यावर आहे. या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे.
गेल्या काही दिवसांत डिझेलच्या दरात चारवेळा तर पेट्रोलच्या दरात जवळपास तीनवेळा कपात झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 60 पैशांची कपात झाली आहे. मात्र, इतक्या लहान स्वरुपातील दरकपातीमुळे सामान्य नागरिकांना हवा तसा दिलासा मिळालेला नाही.
यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 14 आणि 16 पैशांनी स्वस्त झाले होते.
जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १६ रूपयेपर्यंत तर डिझेलचे १४ रूपये प्रति लिटर वाढले आहेत.