fbpx

आजचा पेट्रोल-डिझेल दर जाहीर ; २२ सप्टेंबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही इंधन दर स्थिर आहेत. नुकताच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत तूर्त पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास महाराष्ट्र ,केरळ या राज्यांनी विरोध दर्शवला होता.

गेल्या ५ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात १५ पैशांची सवलत दिली होती. यानंतर सलग दर स्थिर आहेत. जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.

आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे.

आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.१९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.७१ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.०४ रुपये आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज