fbpx

खुशखबर…डिझेल झाले स्वस्त, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल दरात कपात केली आहे. आज गुरुवारी डिझेल २० ते २५ पैशांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आज पेट्रोलचे दर सलग 33 व्या दिवशीही स्थिर आहेत. आज पेट्रोल दरात कोणताही बदल झालेला नाहीय. परंतु डिझेलच्या दरात अशीच घसरण सुरु राहिल्यास पेट्रोलचे दरही खाली येतील, असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.६६ रुपये इतका झाला आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढल्याने मागील दोन महिन्यात कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. त्यामुळे देशभरातील अनेक शहरात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली. डिझेल शंभरीच्या नजीक पोहोचले आहे. या दरवाढीने सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती.

जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १५ रूपये ५१ पैशांनी तर डिझेलचे १४ रूपयेपर्यंत  प्रति लिटर वाढले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज