⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव : १६ सेप्टेंबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ ।  पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग अकराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे ठेवले आहे. पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने भारतामध्येही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, तरीही भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 11व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

गेल्या ५ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात १५ पैशांची सवलत दिली होती. यानंतर सलग दर स्थिर आहेत. जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.

काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?

>> दिल्ली पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर

>> नोएडा पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर

>> जयपूर पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर

>> भोपाळ पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.