⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आजचा पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या प्रति लिटरचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२१ ।  पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग २९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले आहेत. त्यामुळे जळगावात आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढल्याने मागील दोन महिन्यात कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. त्यामुळे देशभरातील अनेक शहरात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली. डिझेल शंभरीच्या नजीक पोहोचले आहे. या दरवाढीने सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कंपन्यांनी तूर्त इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत.

जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १५ रूपये ५१ पैशांनी तर डिझेलचे १४ रूपये ५२ पैसे प्रति लिटर वाढले आहेत.

देशभरातील मोठ्या शहरातील दर 
आज रविवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. शुक्रवारी तामिळनाडू राज्य सरकारने पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आजच्या घडीला चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.

दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात सलग दोन सत्रात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.६५ डॉलरने घसरला आणि ६८.४४ डॉलर प्रती बॅरल झाला.