⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

तूर्त दिलासा ! आजचा पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारी सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर केले. सलग नवव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तूर्त दरवाढीला ब्रेक लागला. मागील महिन्यात पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी महागले.

आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १२१.६९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर १०४.३४ रुपये इतका आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल,डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे.

पेट्रोल-डिझेल आतापर्यंत 10 रुपयांनी महागले
तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर 22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत दिल्लीत पेट्रोल अनुक्रमे 80, 80, 80, 80, 50, 30, 80, 80, 80, 80, 80, 40, 80 आणि 80 पैशांनी प्रतिलिटर महागले आहे. आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.