जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । तब्बल तीन महिन्यांनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी डिझेल दरात कपात केली होती तर दुसऱ्या बाजुला पेट्रोलचा भाव वाढवला होता. आज मात्र दोन्ही इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत.
आज मंगळवारी जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.३५ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९६.१८ रुपये इतका आहे. यापूर्वी सोमवारी डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले होते
मागील गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डीझेल दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. जून महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल १६ वेळा दरवाढ झाली होती. मे महिन्यातही इंधनाच्या दरात १६ वेळा उसळी पाहायाला मिळाली होती.
दरम्यान, जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०८.३५ रुपये पर्यंत आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९६.१८ प्रति लिटर आहे.
देशभरातील बड्या शहरातील दर
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२० रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.९२ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.३५ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.५३ रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.५८ रुपये झाले आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९७.२९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८९.७२ रुपये झाले आहे. चेन्नईत ९४.२४ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.८१ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.५० रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.०९ रुपये आहे.
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.