Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल किंमतीबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी महिनाभरापासूनअधिक काळ इंधन दर स्थिर ठेवल्याचा निर्णय घेतला आहे. आज सोमवारी देशभरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel)दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे जळगावात एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे. (Petrol-Diesel Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. मात्र तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.  मोदी सरकारनं 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यानंतर 4 नोव्हेंबरपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ओमिक्रॉनचे संकट निवळल्यानंतर जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर आता 76.08 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

प्रमुख शहरातील इंधनाचे दर
पेट्रोल कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सोमवारी मुंबईत (Mumbai) एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोलचे दर प्रति लिटर 103.97 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 तर डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 104.67 आणि डिझेल 89.79 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91. 43 रुपये इतके आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -