⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, जाणून घ्या आजचा जळगावातील भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी मे आणि जून महिन्यात केलेल्या दरवाढीने पेट्रोल आणि डिझेलचा भाव विक्रमी पातळीवर गेला आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेल दरवाढ केली. आज देशभरात पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले. या दरवाढीने ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.

सततच्या दरवाढीने जळगावमध्ये पेट्रोल इतिहासात पहिल्यांदा शंभरी पार गेले आहे. तर डीझेल नव्वदी पार गेले आहे. आज जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०२.७१ रुपये इतका आहे. तर डीझेलचा भाव  ९३.०३ रुपये इतका आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडली असता त्यात सततच्या इंधन दरवाढीमुळे महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. 

देशातील इतर मोठ्या शहरातील दर?

आजच्या दरवाढीनंतर आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.५६ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९६.९४ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९५.५२ रुपये आहे.

आज मुंबईत डिझेलचा भाव ९३.८५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८६.४७ रुपये आहे. चेन्नईत ९१.१५ रुपये आणि कोलकात्यात ८९.३२ रुपये डिझेलचा भाव आहे. राजस्थानातील श्री गंगानगर येथे देशातील सर्वात महागडे डिझेल मिळत आहे. येथे डिझेलचा भाव ९९.४९ रुपये झाला आहे. शंभरीच्या उंबरठ्यावर डिझेल पोहोचले आहे.