जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांकडून आज सोमवारी इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तत्पूर्वी रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 ते 15 पैशांची घट पाहायला मिळाली होती. जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे
मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मात्र, जुलै महिन्यात या दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यानंतर संपूर्ण जुलै महिना पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.
तर ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात इंधनाचे दर किंचित का होईना कमी झाले होते. चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 60 पैशांची कपात झाली होती. गेल्या आठवडाभरापासून इंधनाचे दर स्थिर होते. परंतु, रविवारी त्यामध्ये घट झाली होती. त्यामुळे आगामी काळात इंधनाचे दर स्थिर राहून सामान्यांना दिलासा मिळणार का, हे पाहावे लागेल.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.