जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । काही दिवस स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढू लागले आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 25 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा भाव १०८.९२ रुपये इतका आहे. तर डिझेल प्रति लिटर ९७.२८ रुपये इतके आहे.
मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे. याआधी गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली होती. तर बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवला होता..
दरम्यान, आजच्या दर वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.95 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 97.84रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.89 आणि 90.17 रुपये इतका आहे.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.