fbpx

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव : जाणून घ्या जळगावातला प्रति लिटरचा भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढत असल्या तरी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १० व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही.

आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव ‘जैसे थे’च आहे. दरम्यान, आज मंगळवारी जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे. 

दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला होता. कंपन्यांनी ४२ वेळा दरवाढ केली. यात पेट्रोल ११.५२ रुपयांनी वधारले. तर जवळपास १० रुपयांनी डिझेल महागले होते.

जळगाव शहरात गेल्या वर्षी १४ जून २०२० रोजी पेट्रोलचे दर ८३.७१ रूपये तर डिझेल ७२.५४  प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून तेरा महिन्यात पेट्रोलचे दर २५ रूपये २७ पैशांनी तर डिझेलचे २४ रूपये ५४ पैसे प्रति लिटर वाढले आहेत. जुलै २०२१ या महिन्यात  दरात तब्बल ९ वेळा वाढ करत कंपन्यांनी वाहनधारकांना मोठा झटका दिला. त्यामुळे जनतेत रोष आहे.

इतर मोठ्या शहरातील दर?

मुंबईत आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज