⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | आता पर्सनल लोन घेणं कठीण होणार ! RBI ने बदलले नियम, काय आहे वाचा..

आता पर्सनल लोन घेणं कठीण होणार ! RBI ने बदलले नियम, काय आहे वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२३ । भारतात पर्सनल लोन घेणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. पैशांची गरज असेल तेव्हा सामान्य माणूस पर्सनल लोन (Personal Loan) घेण्याचा विचार करतो. मात्र आता पर्सनल लोन घेणं कठीण होणार आहे. आता रिझर्व्ह बँकेने बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFC) असुरक्षित मानल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाशी संबंधित नियम आणखी कडक केले आहेत.

RBI ने ग्राहक क्रेडिटवरील रिस्क वेट १०० टक्क्यांवरुन १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. याचा अर्थ असा की, यामध्ये २५ टक्क्यांना वाढ करण्यात आली आहे. पूर्वी बँकांना (Bank) प्रत्येक १०० रुपये कर्जासाठी ९ रुपये भांडवल राखणे आवश्यक आहे. परंतु, या किमतीत सध्या वाढ झाली आहे. आता यावर ११.२५ रुपये ठेवण्यात येतील.

क्रेडिट कार्ड (Credit Card) मिळवण्यासाठी RBI आणि NBFCs याची रिस्क वेट १०० टक्क्यांपेक्षा कमी आहे. ज्यांमुळे बँक कर्जावरील रिस्क रेट वाढवला आहे. यामध्ये गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वाहन कर्ज तसेच सोने-चांदीच्या दागिन्यांवर हे कर्ज लागू होणार नाही.

दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच ग्राहक कर्ज श्रेणीतील काही कर्जांमध्ये जास्त वाढ झाल्याबद्दल सांगितले होते. त्यांनी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत देखरेख प्रणाली मजबूत करण्याचा सल्ला दिला, वाढत्या जोखमींना सामोरे जावे आणि त्यांच्या स्वतःच्या हितासाठी योग्य सुरक्षा पावले उचलावीत, असं म्हटलं होते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.