उन्हाळ्यात परफेक्ट लूक अन् गर्मीपासून बचाव; कुर्त्यांचे लेटेस्ट ट्रेंड पाहिलेत का?
मुलींना या सीझनमध्ये सुंदर आणि मस्त दिसण्यासाठी कॉटनच्या कुर्त्या सर्वात चांगला पर्याय आहेत. उन्हाळा सुरू झाला असून गर्मी आणि ऊनामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. उन्हाळ्यात गर्मापासून बचाव करण्यासाठी ड्रेसिंगची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा उष्माघात होऊ शकतो. उन्हात चुकीचे कपडे परिधान केल्याने दिवसभर घामाने भिजावं लागतं. उन्हाळ्यात सुती म्हणजेच कॉटनचे कपडे उष्णतेपासून बचाव करतात आणि घाम सहज शोषून घेतात आणि त्वचाही थंड ठेवतात. मुलींना या सीझनमध्ये सुंदर आणि मस्त दिसण्यासाठी कॉटनच्या कुर्त्या सर्वात चांगला पर्याय आहेत.
उन्हाळ्यात कुर्ती घातल्याने आराम मिळतो, उष्णता कमी होते आणि लुकही चांगला दिसतो. उन्हाळ्यात कूल लुकसाठी कुर्तीपेक्षा चांगला आउटफिट नाही. उन्हाळ्यात टी-शर्ट किंवा टॉपपेक्षा स्टायलिश कुर्ती चांगला लुक देते. तुम्ही हा एथनिक कुर्ती कोणत्याही प्रसंगी घालू शकता. फंक्शन, ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यासाठी कुर्ती हा उत्तम ड्रेस आहे.
स्ट्रेट हँडलूम कुर्ता:
उन्हाळ्यात स्ट्रेट हँडलूम कुर्ता खूप सुंदर आणि मस्त लुक देईल. हँडलूम कॉटन स्ट्रेट कुर्तीमध्ये सर्व लहान-मोठे आकार उपलब्ध आहेत, जे तुम्ही ऑनलाइन देखील सहज खरेदी करू शकता. हातमागाच्या सुती कापडापासून बनवलेली ही कुर्ती तुम्ही कॅज्युअल, ऑफिस, कॉलेज, कौटुंबिक कार्यक्रम, पार्ट्या आणि अगदी सणासुदीलाही घालू शकता. यामध्ये फ्लोरल प्रिंटपासून प्लेन कुर्ती उपलब्ध आहे. हा कुर्ता तुम्ही पलाझो सेटसह १ हजार ते २ हजार पर्यंत खरेदी करू शकता. या कुर्ती प्लाझो सूटमध्ये स्टाइल करून तुम्ही उन्हाळ्यात मस्त दिसू शकता.
नसरीन आलिया हँडलूम कुर्ता:
नसरीन आलिया हँडलूम कुर्ता मऊ हँडलूम स्पन कॉटन फॅब्रिकवर हाताने कलाकुसर करून तयार करण्यात आलाय. कॉटन फॅब्रिक्सपासून बनवलेल्या या कुर्तीवर सिक्वेन्स वर्क करण्यात आले आहे. कुर्तीला सुंदर लूक देण्यासाठी पुढील बाजूस बटणांचा वापर करण्यात आला आहे. ही कुर्ती स्टायलिश दिसेल आणि उष्णतेपासूनही वाचवेल. या कुर्तीमध्ये प्लाझो पॅंट आणि दुपट्टा आहे जो तुमच्या ड्रेसला संपूर्ण लुक देईल. हा कुर्ती सूट तुम्ही दोन हजार रुपयांना ऑनलाइन खरेदी करू शकता. या सूटसह, तुम्ही ड्रेससह डिझाइन केलेले मॅचिंग मास्क देखील घालू शकता.