प्रवाशांनो लक्ष द्या! ब्लॉकमुळे भुसावळ विभागातील तब्बल ४६ रेल्वे गाड्या रद्द, पहा संपूर्ण यादी
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाडसह अंकाई स्थानकाजवळ रेल्वेने यार्ड रीमोल्डींगच्या कामासाठी दहा दिवसांचा ब्लॉक जाहीर केल्याची माहिती रेल्वेचे सिनियर डीसीएम शिवराज पाटील यांनी दिली. यात तब्बल 46 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान, रद्द गाड्यांमध्ये काही हॉलिडे स्पेशल गाड्यांचाही समावेश आहे. काही गाड्या या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाने 19 ते 29 जून या काळात ब्लॉक घेतला असून या काळात अप मार्गावरील 23 व डाऊन मार्गावरील 23 अश्या 46 गाड्या रद्द करण्यात आल्या. प्रवाशांना आता वेळेवर दुसर्या गाडीचे आरक्षण तिकीट काढावे लागणार आहे.
नांदेड-मनमाड एक्सप्रेस ही गाडी 19 ते 27 जून, मनमाड-नांदेड 20 ते 28, मनमाड-मुंबई 25 ते 28, मुंबई ते मनमाड 26 ते 29, काकीनाडा-साईनगर शिर्डी 25 ते 27, साईनगर शिर्डी-काकीनाडा 26 ते 28, सिकंदरबाद- मनमाड 24 ते 26, मनमाड-सिकंदराबाद 25 ते 27, सिकंदराबाद-मनमाड 25 ते 24 ते 27, येलहंका-काचेगुडा 24 ते 27, दौंड-निजामाबाद 25 ते 28, निजामाबाद-पुणे 24 ते 27, विशाखापटन्नम-साईनगर शिर्डी 23 जून, साईनगर शिर्डी-विशाखापटनम 24 जून, साईनगर शिर्डी-कालका 28 जून, कालका-साईनगर शिर्डी 26 जून, सीएसएमटी-जालना 25 ते 28 जून, जालना-सीएसएमटी 26 ते 29 जून, अजनी-पुणे 26 जून, पुणे-अजनी 25 जून, सीएसएमटी-आदिलाबाद 27 व 28 जून, आदिलाबाद-सीएसएमटी 26 व 27 जून, सिकंदराबाद-सीएसएमटी 27 व 28 जून, सीएसएमटी -सिकंदराबाद 26 व 27, दादर-साईनगर शिर्डी 27 जून, साईनगर शिर्डी-दादर 28 जून, हडपसर-नांदेड 27 जुन, नांदेड-हडपसर 26 जून, सीएसएमटी -नांदेड 27 व 28 जून, नांदेड-सीएसएमटी 26 व 27, दरभंगा-मनमाड 27 व 28, मनमाड-दरभंगा 27 व 28, पुणे-दरभंगा 27 जून, दरभंगा-पुणे 29 जून, दादर-काजीपेट 26 जून, काजीपेट-दादर 25 जून, नागपूर-पुणे 27 जून, पुणे-नागपुर 28 जून, नागपुर-पुणे 26 जून, पुणे-नागपुर 27 जून, जसीडीह-पुणे 26 जून, पुणे-जसीडीह 24 जून, काजीपेट-पुणे 27 जून, पुणे-काजीपेट 24 जून, नांदेड-हजरत निजामुद्दीन 28 जून, हजरत निजामुद्दीन-नांदेड सचखंड एक्स्प्रेस 29 जून रोजी रद्द करण्यात आली.