⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | पातोंडा सोसायटी निवडणूक : परिवर्तन पॅनलचे‎ वर्चस्व; चेअरमनपदी सुनील पवार‎

पातोंडा सोसायटी निवडणूक : परिवर्तन पॅनलचे‎ वर्चस्व; चेअरमनपदी सुनील पवार‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर तालुक्यातील पातोंडा‎ येथील विविध कार्यकारी विकास ‎सोसायटीची निवडणूक नुकतीच‎ पार पडली. यात परिवर्तन पॅनलने ‎वर्चस्व राखले असून त्यांनी ७ ‎ जागांवर तर बहुजन शेतकरी‎ पॅनलने ६ जागांवर विजय‎ मिळवला. दरम्यान, साेसायटीच्या ‎चेअरमनपदी सुनील पवार तर‎ व्हॉइस चेअरमनपदी जगन्नाथ‎ सोनवणे यांची निवड झाली आहे.‎

पाताेंडा येथील विकास‎ साेसायटीची निवडणूक‎ झाल्यानंतर निवडणूक निर्णय‎ अधिकारी यांनी शुक्रवारी चेअरमन‎ व व्हाईस चेअरमन पदाची‎ निवडणूक घोषीत केली होती. या‎वेळी चेअरमन व व्हाॅइस चेअरमन‎ पदासाठी बहुजन शेतकरी‎ पॅनलतर्फे किशोर मोरे, राहुल‎ लाबोळे यांनी ही अर्ज सादर केला‎ होता. मतदान प्रकियेत सुनील‎ ‎पवार व जगन्नाथ सोनवणे यांना ७‎ मते मिळाली तर किशोर मोरे,‎ राहुल लांबोळे यांना ६ मते‎ मिळाली. निवडणूक निर्णय‎ अधिकारी विवेक जगताप यांनी‎ चेअरमन पदासाठी सुनील पवार‎ तर व्हॉइस चेअरमन म्हणून‎ जगन्नाथ सोनवणे यांचे नाव‎ घोषित केले. त्यांना सेक्रेटरी व‎ कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या‎वेळी दोन्ही पॅनलचे सदस्य‎ उपस्थित होते. निकाल जाहीर‎ होताच परिवर्तनतर्फे जल्लोष‎ साजरा करण्यात आला.

यावेळी‎ पॅनलचे प्रकाशक जितेंद्र पवार,‎ निवृत्त मुख्याध्यापक जयवंतराव‎ पवार, सुकलाल बोरसे, मोरेश्वर‎ पवार, रघुनाथ चौधरी, गजानन‎ पाटील, मेघनाथ सूर्यवंशी, अशोक‎ पवार, दिलीप पाटील, विठ्ठल‎ बोरसे, सुनील चौधरी, हिरामण‎ माळी, विनोद पवार हजर हाेते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह