जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ ऑगस्ट २०२१ । प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल जि जळगाव अंतर्गत अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, पातरखेडा येथे खावटी अनुदान योजनेचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात एकूण 51 लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. सदर किट 18 किलोचे होते, ते उपस्थित आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रकल्प अधिकारी श्रीमती वनिता सोनवणे, प्रांताधिकारी विनय गोसावी, एरंडोल तसेच पातरखेडा शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी अण्णा पाटील, शाळेच्या अध्यक्षा सुनंदाबाई शिवाजी पाटील, सचिव विजय शिवाजी पाटील, अजय शिवाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून शालिग्राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता सतीश पैलवान, दीपक पैलवान, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आमले, माजी सरपंच जळू रवींद्र जाधव, संपादक अनिल न्हाळदे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी विजय गाढे, एरंडोल तालुका खावटी अनुदान योजनेचे सचिव यांनी परिश्रम घेतले. तसेच एरंडोल तालुक्यातील लाभार्थ्यांना किट वाटप सुरू झाले आहेत.