⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

भुसावळ रेल्वे स्थानकावर पार्किंग ठेक्यात प्रवाशांची लूट, मनमानी दराने वसुली

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । भुसावळ रेल्वे स्थानकावरील पार्किंगमध्ये वाहनचालकांची लूट सुरू आहे. वाहनचालकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्यात येत असून पावतीवर १५ रुपये लिहिलेले असताना देखील अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. पार्किंग चालकाच्या मनमानी कारभारामुळे वाहनधारकांना भुर्दंड सहन करावा लागत असून भुसावळ रेल्वे प्रशासन लक्ष वेधणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भुसावळ स्थानकावरून दररोज हजारो प्रवाशांसह चाकरमानी प्रवास करतात. यावेळी हजारोच्या संख्येने वाहनधारक रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूस असलेल्या पार्किंगमध्ये आपले वाहने लावतात. सध्या कंत्राटदार सौ.सीमा चंद्रकांत चौधरी हे यांच्याकडे पार्किंगचा मक्ता आहे. पार्किंगचा मक्ता निश्चित केल्यानंतर कोणत्या वाहनासाठी आणि कालावधीसाठी किती शुल्क आकारावे हे देखील निश्चित केलेले असते. भुसावळ मुळात दर्शनी भागात असा फलकच नसून आकारणी देखील ठरवलेल्या दराने होत नाही.

ration card
भुसावळ रेल्वे स्थानकावर पार्किंग ठेक्यात प्रवाशांची लूट, मनमानी दराने वसुली 1

निश्चित दरानुसार दोन तासांसाठी सायकल ५ रुपये, तर दुचाकीसाठी ५ रुपये व दहा तासांसाठी २० रुपये घेतले जात आहे. सध्या दोन तासांसाठी आणि दहा तासांसाठी असा कोणताही फरक न ठेवता सर्वांसाठी सारखाच दर आकारला जात आहे. मासिक पासाच्या रकमेत भरमसाठ वाढ केली आहे.

सर्वसामान्य ग्राहकांच्या सायकलसाठी मासिक पास ३०० रुपये तर दुचाकीसाठी ६०० रुपये घेतले जात आहे. तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अर्धा दरात मासिक पास दिला जात आहे. परंतु या पार्किंमधून दिल्या जाणाऱ्या पावतीवर दुचाकीसाठी पहिल्या सहा तासासाठी ५ रुपये तर २४ तासांसाठी १५ रुपये दर दिला आहे. तर सायकलसाठी पहिल्या सहा तासासाठी ५ रुपये तर २४ तासांसाठी १० रुपये दर दिला गेला आहे. पावतीवर जरी २४ तासांसाठी दुचाकीला १५ रुपये दर असला तरी त्यापेक्षा कमी वेळेसाठीच २० रुपये आकारणी केली जात आहे.

Mahagenco
भुसावळ रेल्वे स्थानकावर पार्किंग ठेक्यात प्रवाशांची लूट, मनमानी दराने वसुली 2

जळगाव रेल्वे स्थानकावर ६+४ तासांसाठी दुचाकींचा दर १५ रुपये आहे. मात्र भुसावळ रेल्वे स्थानकावर पार्किंगचालक दहा तासांसाठी १५ रुपयांहून अधिक रुपये घेत असून प्रवाशांची लूट करत आहे. येथे मशीन पावती मागितली असता ते न देता एक दुसरीच पावती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे भुसावळ स्थानकावर जळगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगची पावती देण्यात येत आहे. प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची भुसावळ मध्य रेल्वे प्रशासन दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.