---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

अन्‌ बसचे अचानक झाले ब्रेक फेल ; कार-रिक्षा थोडक्‍यात वाचले

parivahan bus break down
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ ।जळगावच्या नवीन बसस्‍थानकातून निघालेल्या बसचे स्वातंत्र्य चौकात अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.

parivahan bus break down

 

---Advertisement---

जळगाव बस स्थानकावरून सकाळी नऊला जळगाव पाचोरा बस (क्र. एमएच १४ डीजे २१७८) पाचोरा जाण्यासाठी मार्गस्‍थ झाली. मात्र स्वातंत्र चौकात अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे बसचा अपघात होता होता टळला. बसस्‍थानकापासून अवघ्‍या काही अंतरावर असलेल्‍या चौकातच सदर घटना घडली. प्रवाशांनी बस भरलेली असल्‍याने यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता होती.

बसचे ब्रेक फेल झाले त्यावेळी चौकातून दुसऱ्या बाजून एक रिक्षा तर समोरून कार येत होती. ब्रेक लागत नसल्‍याने बस कार किंवा रिक्षाला धडकणार होती. यावेळी चालकाने देखील आरोड्या मारल्‍या. मात्र बस चालक जाकिर पठाण यांनी प्रसंगावधान दाखवून गिअरच्या सहाय्याने वेगात असलेल्या बसवर नियंत्रण मिळविले.

 

ब्रेक फेल झाल्‍याबाबत चालक जाकीर पठाण यांनी घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली. यानंतर जळगाव आगारातील मेकॅनिकल यांनी बसची तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा केली. ही दुरूस्‍ती केल्‍यानंतर बस पुन्‍हा मार्गस्‍थ करत असताना बसस्‍थानकातून बस निघण्यापुर्वीच बसचे ब्रेक पुन्हा फेल झाले. यामुळे बसस्थानकात गोंधळ निर्माण झाला होता.

 

दोनदा प्रकार घडल्‍याने चालकाने पाचोरा आगाराच्या अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती सांगितली. मात्र अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले नसल्‍याचे चालकाने सांगितले. दोन वेळेस प्रकार घडल्‍याने पठाण यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी उपचार करण्यासाठी दवाखान्यात दाखल झाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---